मुंबई: पुढारी वृत्तसेवा : जात, धर्म, भाषेची विविधता असूनही संविधानामुळे देश एकसंघ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानातून सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुता शिकविली आहे. मात्र, हिंदू धर्माबाबत विखारी वक्तव्य करणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीत एखाद्या धर्माविरोधात भूमिका जर कोणी घेत असेल. तर ती भूमिका संविधानविरोधी ठरते. त्यामुळे अरविंद केजरीवाल (Ramdas Athawale VS Arvind Kejriwal) हे संविधान विरोधी आहेत. त्यांच्या ढोंगीपणापासून आंबेडकरी जनतेने सावध रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आगामी निवडणुकीमध्ये स्वतःला कृष्ण संबोधून विरोधकांना कंस संबोधणारे अरविंद केजरीवाल हे कधीही एका विचारावर ठाम राहिले नाहीत. केजरीवाल (Ramdas Athawale VS Arvind Kejriwal) यांनी कधीही दलित अत्याचारावर निषेध नोंदवला नाही. दलितांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत केवळ दलित मतांवर डोळा ठेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण केले. केजरीवाल यांच्या या ढोंगीपणाला आंबेडकरी जनता भुलणार नाही, असेही आठवले म्हणाले.
जहरी टीका करणे लोकशाहीत अयोग्य आहे. केजरीवाल यांनी अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. कधी हनुमान चाळीसा म्हणतात, तर कधी हिंदू धर्माविराेधात विधान करतात. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत. केजरीवालांचा ढोंगीपणा आंबेडकरी जनतेने ओळखून सावध व्हावे. ते खरे संविधनाविरोधी आहेत, असा आरोप आठवले यांनी केला.
हेही वाचलंत का ?