Shivsena Crisis : तू न थकेगा कभी...अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ! आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत  | पुढारी

Shivsena Crisis : तू न थकेगा कभी...अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ! आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत 

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण नाट्यमयरित्या सुरु आहे. काल (दि.8) निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठविण्यात आल्याचा निर्णय दिला. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना या चिन्हाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर दोघांना ‘शिवसेना’ हे नाव देखील वापरता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट (Shivsena Crisis) केली आहे. त्यांनी आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांची कविता शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.

Shivsena Crisis

Shivsena Crisis : तू न थकेगा कभी

इंन्स्टाग्राम अकाउंटवर हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांची अग्निपथ! ही कविता शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे. कविता पुढीलप्रमाणे

वृक्ष हों भले खड़े

हों घने, हों बड़े
एक पत्र छाँह भी
मांग मत! मांग मत! मांग मत!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

तू न थकेगा कभी
तू न थमेगा कभी
तू न मुड़ेगा कभी
कर शपथ! कर शपथ! कर शपथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

यह महान दृश्य है
चल रहा मनुष्य है
अश्रु-स्वेद-रक्त से
लथ-पथ! लथ-पथ! लथ-पथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

ही कविता सध्या चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांनी एक ट्विटही केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, ही कविता शेअर करत आदित्य यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे.

खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच, आम्ही सत्याच्या बाजूने आहोत.  असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray)

हेही वाचलंत का?

Back to top button