

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरासह उपनगरात पडत असलेल्या परतीच्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपले. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले असून, रस्त्यांवरची वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्याही पाच ते दहा मिनिट विलंबाने धावत आहेत. सकाळी छत्री न घेता कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना स्टेशन बाहेर पडल्यानंतर पावसात भिजत भिजतच बस व टॅक्सी पकडावी लागत आहे. छत्री नसल्यामुळे स्टेशन बाहेर व बस स्टॉपवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
हेही वाचा: