डेटिंग ॲपवर ओळख, गुडघ्यावर बसून प्रपोज…साठीतील महिलेला साडेतीन लाखांना गंडा | पुढारी

डेटिंग ॲपवर ओळख, गुडघ्यावर बसून प्रपोज...साठीतील महिलेला साडेतीन लाखांना गंडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील सांताक्रुझ येथील एका ५७ वर्षीय महिलेला डेटिंग ॲपवर ओळख करणे महाग पडले. त्याने त्या महिलेशी चांगलीच ओळख करून तिच्याकडून पैसे उकळले. त्याने आपण श्रीमंत असल्याचे सांगितले होते. त्याने सदर महिलेला फिरायला नेले. एका महिन्यात अनेकवेळा तो तिला फिरायला घेऊन गेला. तसेच लवकरच त्याने आपल्या पालकांशी ओळख करून देण्याचे आश्वासनही दिले. त्याने वेळोवेळी तिच्याकडून पैसे उधार घेतले. त्याचबरोबर, तिच्याकडील सोन्याची चेन घेऊन तो गायब झाला.
आपली साडेतीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने तत्का‍ळ वाकोला पोलिसांत एफआयआर दाखल केले. ती एकटीच राहते आणि कुटुंबातील एका आजारी सदस्याची काळजी घेण्यासाठी तिने काही वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. ती तिच्या बचतीतून जगत आहे आणि सेटल होण्यासाठी प्रयत्न करत होती.

२४ जुलै रोजी तिची डेटिंग अॅपवर ५० वर्षीय विनीत शाहसोबत मैत्री झाली. काही वेळ गप्पा मारल्यानंतर तिनी आपला फोन नंबर दिला. शहाने तिला आपण श्रीमंत असल्याचे भासवले. अमेरिकन लहेजामध्ये तो बोलला आणि तिला सांगितले की त्याचं एक रेस्टॉरंट आहे. तो यूएसमध्ये २५ वर्षांपासून राहत होता. त्याने एका मुलासह घटस्फोटित असल्याचेही सांगितले होते. बिझनेस पार्टनरसोबत रेस्टॉरंट उघडण्यासाठी तो मुंबईत आल्याचे सांगितले.

सदर महिलेने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, “एकमेकांना ओ‍ळखल्यानंतर त्याने तत्काळ डेटिंग ॲपवरून आपलं प्रोफाईल हटवलं. त्याने सांगितले की, त्याला योग्य महिला मिळालीय आता त्याला ॲपची आवश्यकता नाही.”

दोघे एकमेकांना भेटू लागले होते. तिने सांगितले की, तो पेडर रोड येथे राहत होता. पण माझ्यासाठी सांताक्रुझला यायचा. शाकाहारी असल्याने आम्ही शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये भेटलो. त्याने सांगितले की, त्याचे पालक यूएसमधील त्यांची मालमत्ता विकत आहेत आणि त्याला त्याच्या खर्चासाठी तात्पुरते पैसे हवे आहेत. महिलेने त्याला ४० हजार रुपये दिले.

४ ऑगस्ट रोजी शाहने तिला आपला वाढदिवस असल्याचे सांगितले आणि त्याला भेट म्हणून एक टॅब हवा असल्याचे म्हटले. तिने त्याला एक टॅब आणि एक सिम कार्ड दिले. “तो सहज बोलणारा होता आणि जेव्हा मी त्याला काही विचारले तेव्हा तो कधीही गोंधळला नाही. जेव्हा त्याला कळले की माझ्याकडे नोकरी नाही, तेव्हा त्याने माझे पैसे एका ज्वेलर्समध्ये गुंतवण्याची ऑफर दिली जेणेकरून मला निश्चित परतावा मिळू शकेल. मी त्याला १ लाख रुपये देऊन गुंतवणूक करण्यास सांगितले.” नंतर, त्याने तिच्यासाठी नवीन सेलफोन खरेदी करण्याबद्दल सांगितले त्याच्याकडून १५ हजार रुपये घेतले. परंतु, गॅझेट कधीच विकत घेतले नाही. तसेच त्याने त्या महिलेला आपली आई तिच्यावर प्रेम करेल,

हे सर्व असताना, आत्मविश्वासाने युक्तीने त्या महिलेला खात्री दिली की त्याची आई तिच्यावर प्रेम करेल.

दोन वेळा शाह तिच्या घरी गेले. 30 ऑगस्ट रोजी, त्याने तिच्या अपार्टमेंटमध्ये एक गुडघ्यावर बसून भव्यपणे प्रपोज केले. तो तिच्या जवळच्या नातेवाईकाला भेटला आणि माझा विश्वास मिळवला. “त्याने मला अंगठी आणि लग्नाचा पोशाख ऑनलाइन दाखवला जेणेकरून मला काय आवडते ते मी निवडू शकेन. आम्ही एका स्थानिक ज्वेलरकडे अंगठीची ऑर्डर देण्यासाठी गेलो. त्याने सांगितले की मी घातलेली सोन्याची चेन मला आवडली आहे आणि ती लग्नात घालायची आहे आणि त्यानंतर कायमचे. मी त्याला साखळी दिल्यानंतर, त्याने ज्वेलर्सला त्याची किंमत मोजायला मिळवून दिली,” ती म्हणाली.

शाहने ३० ऑगस्ट रोजी तिला प्रपोज केले. तिच्या अपार्टमेंट येथे गुडघ्यावर बसून त्याने तिला प्रपोज केले. तिच्या जवळच्या नातेवाईकांना भेटला आणि तिचा विश्वास मिळवला. त्याने अंगठी आणि लग्नातील कपडे तिला ऑनलाईन दाखवून आणि निवडण्यास सांगितले. ते दोघे एका अंगठीची ऑर्डर देण्यासाठी एका स्थानिक सोनाराकडे गेले. तो म्हणाला की, तिने घातलेली सोन्याची चेन त्याला आवडली आहे आणि ती लग्नात घालायची आहे. तिने शाहला चेन काढून दिली. ही दोघांची शेवटची भेट होती. दुसऱ्या दिवशी तिने अनेकदा त्याला कॉल केला पण ,त्याने पोटन घेतला नाही. तिने मेसेज करण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन स्विच ऑफ केला होता. १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तिने नॉन प्राफिट ग्रपकडे मदत मागितली.

नॉन प्रॉफिट हार्मनी फौंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई म्हणाले, “आम्ही झोनल डीसीपीला कळवले आहे की या महिलेला तिचे पैसे परत मिळावेत यासाठी जलद तपास व्हावा.”

Back to top button