मराठा आरक्षणाबाबत ‘मंत्रिमंडळ उपसमिती’ची चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना | पुढारी

मराठा आरक्षणाबाबत 'मंत्रिमंडळ उपसमिती'ची चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘मंत्रिमंडळ उपसमिती’ स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. ही ६ सदस्यीय समिती राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करणार आहे.

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करणार आहे.

हेही वाचा :

Back to top button