SBIचे व्याजदर आजपासून वाढले; गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे हप्ता वाढणार | पुढारी

SBIचे व्याजदर आजपासून वाढले; गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे हप्ता वाढणार

SBIचे व्याजदर आजपासून वाढले; गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे हप्ता वाढणार

नवी दिल्ली – पुढारी ऑनलाईन – देशातील सर्वांत मोठी कर्जवितरक बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटमध्ये ७० बेसिस पॉईंट म्हणजेच ०.७ टक्के इतकी वाढ केलेली आहे. त्यामुळे या बँकेचा बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट १३.४५ टक्के इतका झालेला आहे. त्यामुळे बँकेने वितरित केलेली जी कर्जं बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटशी सलग्न आहेत, त्यांचे हप्ते वाढणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाचा आताच बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट हा १२.७५ टक्के आहे. (SBI Interest Rate Hike)

ही अंमलबजावणी गुरुवार (१५ सप्टेंबर) होत आहे. बँकेने याच बरोबरीने बेसिस पाईंटमध्येही वाढ करत तो ८.७ टक्के इतका केला आहे.
कर्जांचे व्याज ठरवण्याच्या या दोन जुन्या पद्धती आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया प्रत्येक तिमाहीला याचा आढावा घेत असते. स्टेट बँकेने व्याजदरात वाढ केली तर इतर बँकाही तोच मार्ग स्वीकारतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनेटरी पॉलिसची बैठक पुढील आठवड्यात आहे. त्यात महागाई रोखण्यासाठी पुन्हा एकदा व्याजदर वाढवले जातात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. ही बैठक २८ ते ३० सप्टेंबर या कालावधित होणार आहे.

हेही वाचा

Back to top button