jadapinkettsmith : ‘बाल्ड इज ब्युटीफुल डे’ हॉलिवूड अभिनेत्री जेडा स्मिथची पोस्ट होत आहे व्हायरल…(पाहा फोटो)

jadapinkettsmith : ‘बाल्ड इज ब्युटीफुल डे’ हॉलिवूड अभिनेत्री जेडा स्मिथची पोस्ट होत आहे व्हायरल…(पाहा फोटो)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : हॉलिवूड अभिनेत्री आणि सिंगर जेडा पिंकेट स्मिथने अलीकडेच 'बाल्ड इज ब्युटीफुल डे' साजरा करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक सुंदर सेल्फी पोस्ट केला. jadapinkettsmith

पेज सिक्सनुसार, जेडाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर केला आणि कॅप्शनसह फोटो शेअर केला, "केस नसलेल्या माझ्या सर्व भाऊ आणि बहिणींना हॅपी बाल्ड हा सुंदर दिवस आहे," असे कॅप्शन दिले.

2022 च्या ऑस्करच्या सहा महिन्यांपूर्वी जेडाचा नवरा विल स्मिथने कॉमेडियन ख्रिस रॉकने जेडाच्या टक्कलवर विनोद केला होता. त्यामुळे विल स्मिथला प्रचंड राग आला होता. त्याने स्टेजवर जाऊन सर्वांसमोर ख्रिस रॉकला जोरदार मुक्का मारला होता. त्यावेळी विल स्मिथला जेडाच्या आजाराबाबत माहित नव्हते. या प्रकरणाची त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. या वर्षी स्मिथने पहिल्यांदाच ऑस्कर जिंकला होता. मात्र, त्याच्या अभिनय आणि ऑस्कर जिंकण्यापेक्षा अधिक चर्चा या घटनेची झाली होती.

हॉलिवूड अभिनेत्री आणि सिंगर जेडा स्मिथ ही गेल्या अनेक वर्षांपासून 'अॅलोपेसिया एराटा' या आजाराने त्रस्त आहे. या आजारात डोक्यावरील केस गोल-गोल पॅच पडून जातात. उपचारानंतर परत आले तरी अनेक वेळा हा आजार पुन्हा पुन्हा होतो. तसेच या आजारात शरीरावरी सगळे केस निघून जातात. jadapinkettsmith

जेडाने तिच्या फेसबुक वॉच शो 'रेड टेबल टॉक' मध्ये 2018 मध्ये तिच्या केसगळतीच्या संघर्षाबद्दल प्रथम सांगितले.
त्या वेळी, ती म्हणाली, "मला केस गळण्याची समस्या येत आहे. जेव्हा ते पहिल्यांदा सुरू झाले तेव्हा ते भयानक होते. मी एक दिवस शॉवरमध्ये होते आणि माझ्या हातात फक्त मूठभर केस होते आणि मी स्तब्ध झाले, 'अरे देवा, मी टकली होत आहे का?" अशा भयावह भावनांमुळे ती पूर्ण अस्वस्थ झाली होती. त्यानंतर तिने अनेक दिवस यावर उपचार घेतले. तसेच या काळात ती सतत टोपी घालून राहत होती. तिला याबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने आपल्या या आजाराबाबत खुलासा केला. jadapinkettsmith

नंतर मुलगी विलो स्मिथच्या प्रेरणेने, जिने आपल्या आईसाठी डोके मुंडवले आहे, जाडाने 2021 नंतर अखेर तिने टक्कलवर केस पुन्हा वाढवण्यासाठी स्टिरॉइड शॉट्सचा "प्रयोग" करणे थांबवले. आणि स्वतःला टक्कल सह स्वीकारले.

पेज सिक्स नुसार, ती तिच्या स्थितीत शांत आहे असे वाटत असताना, जेडाला देखील आशा आहे की विल आणि ख्रिस रॉक देखील एकत्र येतील. jadapinkettsmith

जेडाच्या या पोस्टवर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल 83509 लोकांनी लाइक केले आहे. तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. जेडा तू गॉर्जस आहे, सो प्रेटी, ब्युटीफुल अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी टाकल्या आहेत. jadapinkettsmith

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news