लोकल ट्रेनच्या ट्रॅकवरील लोखंडी ड्रमचा उलगडा; एकाला अटक

लोकल ट्रेनच्या ट्रॅकवरील लोखंडी ड्रमचा उलगडा; एकाला अटक
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात मध्य रेल्वे मार्गावरील  सीएसएमटी येथून कल्याणच्या दिशेने निघालेल्या एका फास्ट लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर एक लोखंडी ड्रम आडवा आला होता. सतर्क असलेल्या ट्रेनच्या मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली होती. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने एका १५ वर्षाच्या मुलाला अटक केली असून त्याची रवानगी बालसुधार गृहात केली आहे.

मागील आठवड्यात मध्य रेल्वेच्या सेंडहर्स्ट रोड स्थानकाजवळील फास्ट ट्रकवर ही घटना घडली होती. हा घातपाताचा प्रकार असावा अशी शक्याताही वर्तवली जात होती. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. रेल्वे सुरक्षा दल आणि तपास यंत्रणेला या प्रकरणाचा छडा लावण्याचा आदेश दिला होता. रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असलेल्या वस्तीमधील एका १५ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने तो ड्रम ट्रॅकमध्ये सोडून पळ काढला असल्याची माहिती समोर आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन मुलगा हा भुरट्या चोर आहे. त्याने ट्रॅकच्या शेजारी असलेल्या वस्तीतून लोखंडी ड्रम चोरी करून भंगारात विकण्यासाठी रेल्वे ट्रॅकमधून निघाला होता. समोरून ट्रेन येत असल्याचे बघून तो घाबरला आणि ड्रम ट्रॅकवर सोडून पळ काढला होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news