

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबाग-परळ भागातून गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांना मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल ५० मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने लंपास केले.
गणपती मिरवणुकीत चोरीला गेलेल्या सामानाची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेशभक्तांनी गर्दी केली. विशेषतः लालबागचा राजा गणपती मिरवणुकीत मोठी गर्दी जमली आणि चोरांनी या गर्दीचा फायदा घेऊन गिरणगाव येथे अनेक गणेशभक्तांचे किंमती साहित्य चोरले. या घटना दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. काळाचौकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी झारखंडमधून गणपती उत्सवादरम्यान मोबाईल चोरी करण्यासाठी आलेल्या दोन तरूणांना अटक केली होती.
हेही वाचा :