राज्यातील 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा | पुढारी

राज्यातील 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने गुरुवारी (दि.८) दुपारी एक वाजता पावसाच्या पूर्वानुमानात बदल केले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत गुरुवारपासून अतिवृष्टीला सुरुवात होणार आहे. तिन्ही जिल्ह्यांना आजपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गणरायाच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांना पावसाच्या मा-याचा सामना करावा लागणार आहे.

पुढील चार ते पाच दिवस राज्यात विशेषतः कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते असेही, सांगितले आहे. त्यामुळे या संदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्येही गुरुवारपासून अतिवृष्टीला सुरुवात होणार आहे. तिन्ही जिल्ह्यांत रविवारपर्यंत ऑरेंज अलर्ट राहणार आहे. सोमवारीही रायगड आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे, तर उत्तर कोकणात शनिवारपासून सोमवारपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात शनिवार-रविवारी, साता-यात शनिवारपासून सलग तीन दिवस अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. त्यामुळे गणरायाच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांना पावसाच्या मा-याचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा :

Back to top button