

सातारा; पुढारी वृत्तसेवा : याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरणावरून राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. याबाबत खासदार उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली. राजेशाही असती तर असं घडू दिलं नसतं, लाखो लोकांना ज्यांनी मारलं त्याच्या कबरीला सुशोभीकरण करणे ही शोकांतिका असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे. आज (दि ८) सातारा येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार उदयनराजे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "आधीच्या सरकारने या घटनेला विरोध केला नाही; पण या सरकारने जे पाऊल उचलले ते स्वागतार्ह आहे. पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी प्रतापगड येथील अफजल खानाची कबर खुली केली पाहिजे. लोकशाहीची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली आहे. त्यांचा इतिहास जिवंत राहण्यासाठी अफजलखानाची कबर खुली करून लोकांना इतिहास समजून सांगितला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :