पेंग्विन सेनेने आता कबर बचाव अभियान सुरू करावे : आशिष शेलार | पुढारी

पेंग्विन सेनेने आता कबर बचाव अभियान सुरू करावे : आशिष शेलार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  पेंग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरू करावं, अशी खोचक टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर केली. 1993 च्या मुंबई बाँम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी उद्धव ठाकरेंनी परवानगी कशी दिली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने मुंबईत बाँम्बस्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, त्याचा प्रमुख साक्षीदार असलेल्या याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरण करण्यात आले. यावर  प्रतिक्रिया देताना आमदार शेलार म्‍हणाले,”मैदानै, उद्याने, स्मशानभूमी यांचे सुशोभिकरण, देखभाल, दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी मुंबई महापालिकेची असते. याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होते. महापौर तुमचा होता. तरीही सुशोभिकरणाची खबर मिळाली नाही. माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते, आता ही कबर उखडून दाखवा. नवाब मलिक, अस्लम शेख आणि तूकडे-तुकडे गँगला खुश करण्यासाठी हे करण्यात आले.”

हेही वाचा :

Back to top button