Mumbai : मुंबईत मध्यरात्री मुसळधार पाऊस !

Mumbai : मुंबईत मध्यरात्री मुसळधार पाऊस !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहर व उपनगरात रात्री अकरा वाजल्यापासून पावसाची रिपरीप सुरू झाली असून काही भागात पावसाच्या मुसळधार सरी पडल्या. मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तासाभरात चेंबूरमध्ये सर्वाधिक 32 मीमी पावसाची नोंद झाली. घाटकोपर परिसरात तासाभरात 23 मिमी तर कुर्ला येथे 30 मिमी पावसाची नोंद झाली. रावळी कॅम्प 21 मिमी, नायर हॉस्पिटल 11 मिमी पावसाची नोंद झाली. विक्रोळी येथे 11 मिमी तर विलेपार्ले येथे 8 मिमी पावसाची नोंद झाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news