पुढारी ऑनलाईन डेस्क : मला पुन्हा एकदा केंद्र सरकारने नजरकैदेत ठेवले आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या माजी
मुख्यमंत्री व पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून केला आहे. त्याच्या घराबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि मुख्य गेटला कुलूप असलेला फोटो त्यांनी शेअर केला आहे. तसेच केंद्र सरकार आम्हाला काश्मीरी पंडितांचा शत्रू असल्याचा प्रोजेक्ट करत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे की, "केंद्र सरकार काश्मीरी पंडितांचे वेदना जगासमोर आणत नाही. केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच राज्यात टार्गेट किलिंगचे प्रकार वाढत आहे. मात्र आम्हीच काश्मीरी पंडितांचे शत्रू आहोत, असा प्रचार केंद्र सरकारकडून केला जात आहे. त्यामुळेच मला पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवले आहे."
मेहबूबा मुफ्ती आज दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या सुनील कुमार भट्ट यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार
होत्या. सुनील कुमार भट्ट यांची १६ ऑगस्ट रोजी हत्या झाली होती. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये सुनील आणि त्याचे भावावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना अल बद्रने घेतली होती.
तीन महिन्यांपूर्वी १३ मे रोजी प्रशासनाने मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवले होते. यावेळी त्या बडगाम येथे दौर्यासाठी जाणार होत्या. त्या टार्गेट किलिंगमध्ये बळी पडलेले राहुल भट्ट यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणार होत्या.
हेही वाचा :