आता किमान भाषणावर तरी जीएसटी लावू नका; भूजबळांचा राज्य सरकारला टोला

आता किमान भाषणावर तरी जीएसटी लावू नका; भूजबळांचा राज्य सरकारला टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे, म्हणूनच प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावला जात आहे. आता किमान भाषणावर तरी जीएसटी लावू नका, असा टोला आमदार छगन भूजबळ यांनी राज्य सरकारला लगावला. आज विधीमंडळात त्यांनी जीएसटीच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले.

'स्कूल चले हम जीएसटी के साथ' अशा घोषणा लोक देत आहेत. भारतात आर्थिक मंदी नाही, असे सांगितले जाते; मग सर्व वस्तूंवर जीएसटी का लावला जातो? असा सवाल आमदार भूजबळ यांनी उपस्‍थित केला. आता किमान भाषणावर तरी जीएसटी लावू नका. शाळा, दवाखाना व अन्नधान्याच्या बाबतीत तरी जीएसटी कमी करावा. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेवून केंद्र सरकारला विनंती करावी. आता संपूर्ण देशाचे लक्ष तुमच्या दोघांवर आहे, असा टाेलाही भूजबळांनी लगावला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news