राज्यभरात एकाच वेळी ‘जन गण मन’ राष्ट्रगीताचे केलं गायन | पुढारी

राज्यभरात एकाच वेळी ‘जन गण मन’ राष्ट्रगीताचे केलं गायन

भांडूप ( मुंबई) : पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी (दि.१७) रोजी सकाळी 11 वाजता राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. मंत्रालयापासून ग्रामपंचायतींपर्यंत, शाळा-महाविद्यालयांपासून व्यापारी संकुलापर्यंत सर्वत्र एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. राज्याच्या सांस्कृतिक विभागाने याबाबतचे सविस्तर पत्रक जारी केले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत ९ तारखेला राज्यभरात शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांत सामूहिक राष्ट्रगीत गायन केले जाणार होते. मात्र मोहरमची शासकीय सुट्टी
आणि मंत्रिमंडळ विस्तार अशा धामधुमीत हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. यानंतर आज राज्यभर एकाच वेळी ‘जन गण मन’ हाच कार्यक्रम बुधवारी (दि. 17 ऑगस्ट) ला सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

विक्रम प्रस्थापित करावा

सकाळी 11 ते 11.01 या कालावधीत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे सार्‍या जगासमोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई पोलिसांनी सामूहिक राष्ट्रगीताचे केलं गायन

महाराष्ट्र सरकारकडून सुराज्य महोत्सव सुरू आहे. या निमित्ताने आज बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व राज्यात सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. याला प्रतिसाद देत मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली मुलुंडमध्ये सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केलं आहे.

नाशिक : ‘अनकाई’वरील तलावात दोन जण बुडाले

मुलुंड पोलीस ठाण्यासमोर मुलुंड पोलीस, स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था यांनी एकत्र येत राष्ट्रगीत म्हटले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथमिरे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक वाहने थांबवून या उपक्रमात सहभागी झाले आहेत. नागरिकांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी नागरिकांचे आभार मानले.

हेही वाचलंत का? 

Back to top button