नवी मुंबईत भाजपच्या तिरंगा बाईक रॅलीत हजारो युवकांचा सहभाग | पुढारी

नवी मुंबईत भाजपच्या तिरंगा बाईक रॅलीत हजारो युवकांचा सहभाग

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा; भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर’ हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई भाजप आयोजित तिरंगा बाईक रॅलीला केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आ. गणेश नाईक यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान दिघा तलावापासून सुरुवात झालेल्या रॅलीची बेलापूर महापालिका मुख्यालयाजवळ रात्री साडे दहाच्या सुमारास सांगता झाली. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन राष्ट्रप्रेमाचा आविष्कार घडवला.

हेही वाचा

Back to top button