औरंगाबाद : अत्याचार करून 35 लाखांचा गंडा घालणारा अटकेत | पुढारी

औरंगाबाद : अत्याचार करून 35 लाखांचा गंडा घालणारा अटकेत

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा :  पतीपासून विभक्‍त राहणार्‍या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून, बलात्कार तसेच नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून 35 लाख रुपये घेणार्‍या मुंबईतील आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी दोन महिन्यांनंतर 11 ऑगस्ट रोजी दुपारी अटक केली.

आरोपीला 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. बोहरा यांनी दिले. गणेश हिंदराव पवार (कल्याण) असे आरोपीचे नाव आहे.

पीडिता ही पतीपासून विभक्‍त राहते. ती खासगी नोकरी करून उदरनिर्वाह चालवते. दरम्यान, सप्टेंबर 2018 मध् ये फेसबुकवर पीडितेची ओळख आरोपीशी झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर पीडितेने आपण विवाहित असून, एक मुलगीदेखील असल्याचे  त्याला सांगितले. आरोपीने मुलीसह विवाहितेला स्वीकारण्याची बतावणी केली, तसेच ठाणे महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 35 लाख रुपये उकळले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये बलात्कार केला. आरोपीला न्यायालयाने हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

Back to top button