Aarey metro car shed : मेट्रो कारडेपोसाठी आणखी झाडे तोडली जाणार नाहीत : अश्विनी भिडे | पुढारी

Aarey metro car shed : मेट्रो कारडेपोसाठी आणखी झाडे तोडली जाणार नाहीत : अश्विनी भिडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; आरेतील मेट्रो कारडेपोच्या (Aarey metro car shed) पहिल्या टप्पाचे काम एप्रिल २०२३ रोजी पूर्ण होईल, त्यानंतर ट्रेनच्या चाचण्या होतील आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाईल, असे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचा पदभार सांभाळत असलेल्या अश्विनी भिडे यांनी आज स्पष्ट केले.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेऊन प्रकल्पाची सद्यस्थिती, वाढीव खर्च, कारडेपो आदी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. कारडेपोसाठी यापुढे आणखी झाडे तोडली जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. मेट्रो ३ च्या खर्चात वाढ झाली असून मेट्रोचा कामासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे, असे त्यांनी सांगितले.

कारडेपोचे (Aarey metro car shed) काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण होईल. हा कारडेपोच पहिला टप्पा असेल. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी ट्रेनच्या चाचण्या होतील. चाचण्या झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळते. त्यानंतर मेट्रो सेवा सुरू करता येते, असे भिडे यांनी सांगितले.

 हे ही वाचा :

Back to top button