आरे कारशेडवरील बंदी उठवली, मेट्रोचा मार्ग मोकळा! | पुढारी

आरे कारशेडवरील बंदी उठवली, मेट्रोचा मार्ग मोकळा!

पुढारी ऑनलाइन डेस्क :  मेट्रोचे कारशेड आरे जंगलाच्या जागेत बनवण्यावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागे घेतली आहे. बंदी उठवल्यानंतर आरेमध्ये मेट्रोचे कारशेड बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मेट्रोचे कारशेड आरे जंगलात बनवण्यावरून पर्यावरण प्रेमींनी तीव्र निदर्शने केली होती. तत्कालीन भापज-शिवसेना यांचे सरकार असताना हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मविआचे सरकार आल्यानंतर आरएमध्ये मेट्रोचे कारशेड बनवण्याच्या निर्णयावर स्थगिती आणली होती.

गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे गट- भाजप सरकार आले. या सरकारने आता पुन्हा एकदा मेट्रोचे कारशेड आरएच्या जागेत बनवण्यासाठी मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरे कारशेडवरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे आता मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे.

Back to top button