आरे जंगलातील आगीत अनेक झाडे खाक

आरे जंगलातील आगीत अनेक झाडे खाक

जोगेश्‍वरी ; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी रात्री आरेच्या जंगलात लागलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली. यामागे भूमाफिया टोळीचा हात असल्याचा संशय पर्यावरणवाद्यांनी व्यक्‍त केला.

आरेमध्ये चोरीछुपे सुरू असलेल्या कामांसोबत दीड महिन्यात 20 पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्या वाढल्या आहेत. मंगळवारी रात्री आरे परिसरातील रॉयल पाल्म हॉटेलच्या मागील डोंगरावर आग लागल्याचे समजताच आरे पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग जंगलात मोठ्या प्रमाणात पसरली आणि अनेक झाडे जळून खाक झाली. काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

आरे बचाव चळवळीतील कार्यकर्ते संजीव वॉल्सन यांनी सांगितले की, साधारणत: मार्च ते मे दरम्यान अशा आगी लागतातच. या काळात जंगल सुकलेले असते आणि आग वेगाने पसरते. परिणामी, नुकसानही अधिक होते. आजवर तक्रारी येऊनही पोलिसांनी कधीच कारवाई केलेली नाही.

आगीच्या काही घटना पर्यंटकांकडून फेकल्या गेलेल्या जळत्या विड्या किंवा सिगारेटमुळे देखील लागतात.मात्र बहुतांश घटनांमध्ये आग मुद्दाम लावली जाते असा संशय देखील वॉल्सन यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news