ठाणे : शिवसेना विभाग प्रमुखावर जीवघेणा हल्ला | पुढारी

ठाणे : शिवसेना विभाग प्रमुखावर जीवघेणा हल्ला

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यात शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर बुधवारी सायंकाळी ठाण्यातील श्रीरंग येथील शाखेत दोघा हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित जयस्वाल गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी  जयस्वाल यांचा वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्याचा बहाणा करत दाेघे जण शाखेत आले.  या दोघांनी धारदार शस्त्रांनी  जयस्वाल यांच्यावर वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयस्वाल यांना ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या डोक्याला, कानाला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे, अशी माहिती उपविभागप्रमुख राजेश तावडे यांनी दिली.

हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

हेही वाचलं का ?

Back to top button