रणवीर सिंह याचा आई अंजू भवनानीसोबत भन्नाट डान्स
मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कपल नेहमी चर्चेत असते. हे कपल नेहमी साेशल मीडियावरआपले व्हिडिओ शेअर करत असते. सध्या रणवीर सिंहच्या आई अंजू भवनानी हिच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रणवीर सिंहची आई अंजू भवनानी यांचा रक्षबंधनाच्या दिवशी म्हणजे, २२ ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलात रणवीरच्या आईच्या वाढदिवसाची पार्टी झाली. या पार्टीतील काही व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
या व्हिडिओत रणवीर सिंह आई- वडिलांसोबत भन्नाट डान्स करताना दिसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडिओत रणवीरने सँडोवर डेनिम जॅकेट आणि हॅट तर दीपिकाने लेदर जीन्स आणि लाल रंगाचा टॉप घातला होता.
रणवीरचा आईसोबत भन्नाट डान्स व्हायरल
या व्हिडिओमध्ये रणवीरने आपल्या आई अंजू भवनानीसोबत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील 'दिल चोरी' गाण्यावर डान्स केला. यावेळी रणवीरने चक्क शर्ट काढून गाण्यावर नाचताना दिसला.
यावेळी रणवीरने आपली पत्नी दीपिका पादुकोणसोबत 'बेफिक्रे' या चित्रपटातील 'नशे दी चढ़ दी' गाण्यावर डान्स केला आहे. तर रणवीरने वडिलांसोबत 'पद्मावत' या चित्रपटातील 'खलिबाली' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. यावेळी रणवीरच्या वडिलांनी मुलासोबत जबरदस्त ताल धरला होता.
यानंतर रणवीरने आईला शुभेच्छा देताना 'बार बार दिन ये आए' हे गाणे गायिले. एकंदरीत पाहता रणवीरने रक्षाबंधन आणि आईच्या वाढदिवसानिमित्त खूपच मज्जामस्ती केली आहे.
रणवीर लवकरच आगामी '८३' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय रणवीरने 'सर्कस', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'तख्त' या चित्रपटातही दिसणार आहे.
हेही वाचलं का?
(video: viralbhayani instagram वरून साभार)

