बाबासाहेब पुरंदरे यांची उंची मोजून शरद पवारांनी आपले खुजेपण सिद्ध केले - सदाभाऊ खोत | पुढारी

बाबासाहेब पुरंदरे यांची उंची मोजून शरद पवारांनी आपले खुजेपण सिद्ध केले - सदाभाऊ खोत

पुढारी ऑनलाईन डेस्क: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अख्खी हयात शिवचरित्र लिहिण्यात घालविली आहे. बाबासाहेब पुरेंदर यांची उंची मोजायचा प्रयत्न पवार साहेबांनी करून आपले खुजेपण सिद्ध केले आहे. अशी घणाघाती टिका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व माजी आमदार सदाभाऊ खोत  (Sadabhau Khot ) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केली आहे.

शरद पवारांनी खुजेपण सिद्ध केले – सदाभाऊ खोत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करत शरद पवारांच्यावर टिका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी काल झालेल्या भाषणातील वाक्य, “शिवरायांचा बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय कुणीच केला नाही ” हे लिहुन शरद पवारांना टॅग केले आहे. आणि पुढे म्हंटले आहे की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अख्खी हयात शिवचरित्र लिहिण्यात घालविली त्यांची उंची मोजायचा प्रयत्न पवार साहेबांनी करून आपले खुजेपण सिद्ध केले आहे.

काय बोलले शरद पवार

काल (दि.२३ जूलै) पुण्यामध्ये शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळ्यात  भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या विषयी परखड मत व्यक्त केले होते. भाषणात ते म्हणाले होते, शिवचरित्रामुळे घराघरात पोहचलेल्या  बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही. माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवाजी महाराजांना  दिशा फक्त जिजाऊ यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? असा प्रश्न सवाल उपस्थित केला. नव्या पिढीसमोर वास्तववादी इतिहास येण्याची गरज आहे, असे परखड मत  त्यांनी व्यक्त केले होते.

पण सदाभाऊ खोत यांनी केलेल्या ट्विटमुळे या वादाला नवे वळण मिळणार की काय, या ट्विटवर शरद पवारांची काय प्रतिक्रिया असणार याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागुन राहीले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button