पुणे : शरद पवार यांनी स्वतः शिवचरित्र लिहावे; ब्राह्मण महासंघाचे आव्हान | पुढारी

पुणे : शरद पवार यांनी स्वतः शिवचरित्र लिहावे; ब्राह्मण महासंघाचे आव्हान

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘बाबासाहेब पुरंदरे केवळ ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावर वारंवार टीका करणे योग्य नाही. निधन झालेल्या व्यक्तीवर राजकारणासाठी टीका करण्यापेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत: शिवचरित्र लिहावे. आम्ही त्याचे प्रकाशन करू,’ असे आव्हान देत ब्राह्मण महासंघाने पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय कुणी केला नाही, असे वक्तव्य पवार यांनी शनिवारी पुण्यातील एका कार्यक्रमात केले.

ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांनी शिवचरित्र लिहावे. आम्ही ते प्रसिद्ध करू, असे आव्हानही दिले आहे. महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, ‘बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराजांवर अन्याय केला, हे शरद पवार यांचे वक्तव्य केवळ चुकीचे नसून, निंदनीय आहे. आम्ही पवारांची भेट नाकारली, हेच बरोबर होते, हे आज पुन्हा सिद्ध झाले.’

Back to top button