ये तो ट्रेलर है; उर्वरित वस्त्रहरण म्याव म्याव संपल्यावर करेन : नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : आपले वडील आजारी आहेत, हे आदित्य ठाकरेंना कळते. मात्र दुसऱ्याच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरून उठवताना काहीच वाटले नाही का? हा प्रश्नही मला आदित्य ठाकरेंना विचारायचा आहे. त्यामुळे फक्त ट्रेलरच्या निमित्ताने थोडे ट्विट केले आहे. उर्वरित वस्त्रहरण म्याव म्याव संपल्यावर करेनच. नुसते म्याव म्याव केले, तर आदित्य ठाकरेंची एवढी फाटली. पूर्ण उभा राहिलो असतो, तर त्यांचे काय शिल्लक राहिले असते, याचा आदित्य ठाकरेंनी विचार करावा. त्यामुळे आक्रमकता काय असते, हे नितेश राणेंना सांगा. आणि मग त्याचे उत्तर मी माझ्या भाषेत देईन, अशी जोरदार टीका आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

पनवेलमध्ये आज (दि.२३ ) आयोजित भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान आमदार नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधताना ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात दौरे काढले जात आहेत. आणि राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यातून म्याव म्याव चा आवाज कानावर पडत आहे. म्हणून मी एवढेच सांगितले की हे म्याव म्याव चे आवाज बंद झाल्यानंतर कसे वस्त्रहरण होईल, हे आम्ही देखील महाराष्ट्रासमोर दाखवू. म्हणून अशा पद्धतीचे ट्विट मी मुद्दामून केले.

पक्षप्रमुख आजारी असताना या लोकांनी गद्दारी केल्याचा आव आणला जात आहे; मग कोरोनाच्या काळात ज्यावेळेस लोकं मृत्यूशी झुंज देत होती, त्यावेळेस पर्यटनमंत्री नेमके संध्याकाळी सात वाजता डिनो मोरिया यांच्या घरी काय करायचे? एकीकडे जनता कोरोनाने त्रस्त असताना आदित्य ठाकरे संध्याकाळी डिनो मोरिया यांच्या घरी जायचे तेंव्हा त्यांना लोकांचे आजारपण दिसले नाही का? असा सवालही आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news