पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यात खरिपाच्या सरासरी 1 लाख 95 हजार 710 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत गुरुवारअखेर (दि.14) 73 हजार 808 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. पेरणीचे प्रमाण सरासरीच्या 37 टक्के असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. खरीप पेरणीसाठी आवश्यक बियाणे योग्य प्रमाणात उपलब्ध असून बाजरीचे सुमारे 2 हजार 600 क्विंटल, मका 2 हजार 400, भात 22 हजार, तूर 130, वाटाणा 600, भुईमूग 450 क्विंटल तर सोयाबीनचे 3 हजार 600 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
तालुकानिहाय झालेली पेरणी व कंसात सरासरी पेरणीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) पुढीलप्रमाणे :
हवेली- 821 (4 हजार 906 हे.), मुळशी- 414 (8 हजार 545), भोर- 4 हजार 965 (17 हजार 465), मावळ- 534 (12 हजार 990), वेल्हे- 381 (5 हजार 892), जुन्नर- 11 हजार 931 (29 हजार 777), खेड- 15 हजार 921 (23 हजार 399), आंबेगाव- 7 हजार 606 (16 हजार 14), शिरुर- 12 हजार 236 (33 हजार 700), बारामती- 8 हजार 274 (11 हजार 1), इंदापूर- 3 हजार 836 (8 हजार 414), दौंड- 1 हजार 935 (4 हजार 388), पुरंदर- 4 हजार 951 हे. (19 हजार 219 हे.) याप्रमाणे पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात सुमारे 69 हजार मे. टन खते उपलब्ध असून, त्यामध्ये युरिया 25 हजार 900 मे. टन., डी.ए.पी.- 5 हजार 800 मे. टन, एम.ओ.पी.- 1 हजार 900 मे. टन, एस.एस.पी.- 9 हजार 700 मे. टन, तर विविध संयुक्त खते सुमारे 25 हजार 700 मे. टन उपलब्ध आहेत.
जिल्ह्याच्या 830 मि.मी. या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत 394 मि.मी. (47 टक्के) पाऊस झाला आहे, अशी माहितीदेखील कृषी विभागाने दिली आहे.