राष्ट्रपती निवडणुकीत शरद पवारांनी मुर्मूंना पाठींबा जाहीर करावा : खासदार नवनीत राणा | पुढारी

राष्ट्रपती निवडणुकीत शरद पवारांनी मुर्मूंना पाठींबा जाहीर करावा : खासदार नवनीत राणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क  : आज प्रथमच एक आदिवासी महिला तळागाळातून कष्ट करून पुढे येत आहे. आदिवासींना आज मुख्‍य प्रवाहात आणण्याची आवश्यक आहे. तसेच या समाजात आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रपतीपदाच्या ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा द्यावा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

आमच्या महाराष्ट्राचे नेते, आदरणीय शरद पवार साहेब हे आमचे सर्वांचेच आदर्श आहेत, ज्यांना पाहून आत्ताचे अनेक राजकारणी हे राजकारणात आले. ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन माझ्यासह महराष्ट्रातील अनेक नेते काम करतात; पण आज आदिवासी समाजातून एक महिला पुढे येत असल्याचे  खासदार राणा यांनी सांगितले. पवार साहेबांनी हा पंतप्रधान मोदींनी दिलेला एनडीएचा उमेदवार आहे, असे न पाहता. एक आदिवासी महिला अत्यंत कष्टातून पुढे येत आहे हे समजून घेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दौपदी मुर्मूं यांना जाहीर पाठींबा द्यावा, अशी मागणी केली आहे.

द्रौपदी मुर्मू आज मुंबई

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू प्रचारासाठी आज मुंबईत येणार आहेत. दरम्यान भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची आज बैठक होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुर्मूंना पाठींबा दिल्याने, त्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलेल्या राष्ट्रपती उमेदवारांनी थेट मातोश्रीवर जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. तूर्तास उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा:

Back to top button