राज्‍यात उद्यापासून माेफत कोविड बूस्टर डोस मोहिमेची अंमलबजावणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

राज्‍यात उद्यापासून माेफत कोविड बूस्टर डोस मोहिमेची अंमलबजावणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने शुक्रवारपासून पुढील ७५ दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात  पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍याशी बुधवारी चर्चा झाली. या मोहिमेची  अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, मोहिम कालावधीतील एकही दिवस वाया न घालवता सर्व प्रौढ व्यक्तींना बूस्टर मात्रा मिळाली पाहिजे, याचे नियोजन करा. यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जन जागृती करावी, असे आदेशही त्‍यांनी या वेळी दिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

Back to top button