2022 Hyundai Tucson Facelift: ADAS सारख्या फीचर्ससह नवीन हुंडाई ट्यूसॉन प्रीमियम एसयूवी सादर! | पुढारी

2022 Hyundai Tucson Facelift: ADAS सारख्या फीचर्ससह नवीन हुंडाई ट्यूसॉन प्रीमियम एसयूवी सादर!

2022 Hyundai Tucson Facelift: पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा: कारप्रेमींसाठी विशेषतः हुंडाई कार चाहत्यांसाठी आनंदी बातमी आहे. हुंडाई इंडियाकडून बुधवारी (दि.13) भारतीय बाजारासाठी प्रीमियम एसयूवी 2022 Tucson (2022 ट्यूसॉन) सादर करण्यात आली. 2022 Hyundai Tucson Facelift या मॉडेलसाठी भारतीय कार प्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. एसयूवी कार निर्माताच्या प्लैगशिप आईसीईचे सादरीकरण असेल. 2022 Hyundai Tucson Facelift या मॉडेलचे डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठ्या प्रमाणात अपडेशन केले गेले आहे. मात्र, 2022 Hyundai Tucson Facelift चे सर्वात विशेष फीचर म्हणजे अॅडवान्स ड्राइवर असिस्टेंस सिस्टम किंवा ADAS देण्यात आले आहे. ज्यामुळे या कारची सुरक्षितता आणि ड्राइविंग क्षमता वाढली आहे.

काय आहे 2022 Hyundai Tucson Facelift चे नवीन फीचर्स

फ्रंट लूकमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. त्यामध्ये मोठे ग्रील देण्यात आले आहेत. जे आता एलईडी हेड लाइट युनिट्स सोबत इंटीग्रेट केले आहे.

रियरमध्ये अपडेटेड एलईडी टेल लाइट्स आहेत जे मधल्या एका एलईडी लाइट स्ट्रिपने जोडले आहे.

केबिनमध्ये एक नवीन ऑल डिजिटल टक्सन देण्यात आला आहे 10.1 इंच ड्राइवर डिस्प्ले आणि एक अन्य 10.1 इंच मुख्य इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन यूनिट सोबत लैस आहे.

वायरलेस फोन चार्जिंग

एंबिएंट लाइटिंग

वेंटिलेटेड फ्रंट सीटस्

360 डिग्री कॅमेरा

कीलेस एंट्री आणि ऑटो डिमिंग IRVM इत्यादी फीचर्स आहेत

ADAS सेफ्टी फीचर्स

2022 Hyundai Tucson Facelift च्या गेल्या मॉडेलच्या तुलनेत नवीन TUCSON मध्ये मोठे पाऊल उचलले आहे. लेवल-2 ADAS फीचर्ससह सादर केलेली ही या सेगमेंटमधील ही पहिलीच कार असेल. याला 19 Hyundai SmartSense ADAS (हुंडाई स्मार्टसेंस एडीएएस) फीचर्स सह याचे सादरीकरण केले जाईल. ज्यामुळे पहाडावर चढणे उतरणे आणि कंट्रोल, 6 एअरबॅग, एबीएस, ईबीडी, ईएससी, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि एडीएस लेवल-2, ज्यामध्ये स्टॉप अॅण्ड गो या फंक्शनसह क्रूज कंट्रोल, लेन-कीपिंग असिस्ट, हाई बीम असिस्ट, व्हीकल डिपार्ट अलर्ट्स आणि आणखी अनेक वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश आहे.

इंजिन आणि पॉवर

2022 Hyundai Tucson Facelift मॉडेलला दोन इंजिन विकल्पांमध्ये उपलब्ध केले जाईल. 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समेशन सह NU2.0 पेट्रोल यूनिट आणि 8- स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेला नवीन R2.0 VGT डीजल इंजन मिळणार आहे. पेट्रोल इंजन 156 PS चे पॉवर आणि 192 NM चे टॉर्क जनरेट करते. तर डीजल इंजन 186 PSचे पॉवर आणि 416 NM चे पीक टॉर्क निर्माण करते.

हेही वाचा

Back to top button