महत्त्‍वाची बातमी : सरपंच आणि नगराध्‍यक्ष थेट जनतेतून निवडणार : मुख्‍यमंत्री | पुढारी

महत्त्‍वाची बातमी : सरपंच आणि नगराध्‍यक्ष थेट जनतेतून निवडणार : मुख्‍यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
सरपंच आणि नगराध्‍यक्ष निवडणूक थेट जनतेतून घेण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

देशातील सर्वच राज्‍यांमध्‍ये सरपंच आणि नगराध्‍यक्ष निवडणूक थेट पद्‍धतीनेच आहे. महाराष्‍ट्र सरपंच परिषदेमध्‍येही अशीच मागणी झाली होती. थेट निवड झाली नाही तर सरंपच निवडीवेळी सक्षम उमेदवारांवर अन्‍याय होतो. त्‍यामुळे आम्‍ही पुन्‍हा एकदा या निर्णयाची अंमलबजावणी करत आहोत, असे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष, ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक घेण्‍यात येईल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्‍यात आली आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्येही सुधारणा करण्‍यात आली आहे, असेही त्‍यांनी सांगितले. भाजपने सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने तो बदलला होता. आता पुन्‍हा एकदा सत्तेत आल्‍यानंतर भाजपने हा महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

हेही वाचा : 

 

Back to top button