पणजी; पुढारी वृत्तसेवा : सध्या गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आपण कामात व्यस्त आहे. अधिवेशन संपल्यानंतर आमदार दिगंबर कामत व मायकल लोबो यांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर विचार करता येईल, असे सभापती रमेश तवडकर यांनी म्हटले आहे. पत्रकारांनी त्यांना या विषयावर प्रश्न विचारला होता.
कामत व लोबो यांची आमदारकी रद्द करावी तथा त्यांना आमदार म्हणून आपात्र ठरवावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे. त्यांनी त्यासाठी वकील नेमून याप्रकरणी लवकर निर्णय द्यावा, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, काँग्रेसने कामत व लोबो यांच्या निलंबनाची जी मागणी करणारी याचिका सभापतींकडे केली आहे, त्यावर सभापतींनी लवकर निवाडा द्यावा. अशी आमची मागणी असल्याचे काँग्रेसचे वकील अभिजात गोसावी यांनी सांगितले.