धरणसाठ्यात वेगाने वाढ नाले, ओढ्यांना पूर; खडकवासला जवळपास अर्धे भरले | पुढारी

धरणसाठ्यात वेगाने वाढ नाले, ओढ्यांना पूर; खडकवासला जवळपास अर्धे भरले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत -वरसगाव धरण खोर्‍यात शनिवारी सकाळी पुन्हा अतिवृष्टीला प्रारंभ झाला. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत एकूण 6.95 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 23.83 टक्के पाणीसाठा झाला आहे. ओढ्या, नाल्यांना पूर आला असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खडकवासला धरण जवळपास अर्धे भरले. गेल्या 24 तासांत चारही धरणांत सव्वा टीएमसी पाणी वाढले.

पानशेतला 2.74 टीएमसी (25.7 टक्के), वरसगाव 2.80 टीएमसी (21.80 टक्के) आणि टेमघर धरणात 0.45 टीएमसी (12.15 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. टेमघर, वरसगाव आणि पानशेत या धरणांच्या क्षेत्रात गेल्या 36 तासांत दीडशे ते दोनशे मिलिमीटर दरम्यान पर्जन्यवृष्टी झाली. पानशेत, वरसगावच्या पाणलोटातील तव, शिरकोलीे, दासवे, दापसरे गावांत अतिवृष्टी सुरू आहे. ओढ्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी बंधारे, रस्ते, बुडाले. काही ठिकाणी शेतीही पाण्याखाली गेली आहे. तव येथील शेतकरी लालासाहेब पासलकर म्हणाले, ‘भातखाचरे पुरात बुडाली असून, कामे ठप्प झाली आहेत.’

धरणांतील पाणीसाठा
धरण               आजचा पाऊस           टक्केवारी         एकूण क्षमता
खडकवासला        22                       48.85                   1.92
पानशेत               85                        25.70                  0.82
वरसगाव              86                        21.80                 12.85
टेमघर               1000                      12.15                   3.71
एकूण पाणीसाठा 6.95 टीएमसी

Back to top button