नितीन गडकरी यांना राज्यपालांच्या हस्ते 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी प्रदान | पुढारी

नितीन गडकरी यांना राज्यपालांच्या हस्ते 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी प्रदान

अकोला; पुढारी ऑनलाईन: अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या छत्तीसाव्या वार्षिक दीक्षांत समारंभ पार पडला. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात केली.

यावेळी माजी कुलगुरु डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरु डॉ. विलास भाले, कुलसचिव, शिक्षक व स्नातक विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्वाधिक पदके, सुवर्ण पदके तसेच इतर पारितोषिके प्राप्त करणार्‍या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

Back to top button