Heavy Rainfall : चार दिवस महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा; स्कायमेटचा अंदाज | पुढारी

Heavy Rainfall : चार दिवस महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा; स्कायमेटचा अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिसा आणि पश्चिम बंगाला उपसागरात निर्माण झालेला कमीदाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे सरकला असून त्याने महाराष्ट्राच्या सिमाभागाकडे आगेकूच केली आहे. दुसरीकडे वायव्य बंगाल उपसागर आणि ओडिसा किनारपट्टीवर निर्माण झालेल्या चक्रीवादळ देखील छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राकडे सरकत आहे. यांच्या प्रभावामुळे ५ जुलै ते १० जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम तसेच मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) बरसणार असल्याचा इशारा स्कायमेटने दिलेला आहे. त्यामुळे या आठवड्यात जोरदार पावसाची बॅटींग पहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचा सुचना प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच भागात ५ जुलै ते १० जुलै दरम्यान मोठ्या पावसाचा इशारा (Heavy Rainfall) देण्यात आला आहे. या आधी विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यात मागील २४ तासाच पावसाने हजेरी लावली आहे. संपूर्ण उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात मध्यम पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासात जळगाव जिल्ह्यातील उत्तर भागात ५२ मीमी तर कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण भागात ३२ मीमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत वर्धा, गोंदिया, अमरावती, अकोला, नांदेड, विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम तसेच मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

कमीदाबाचा पट्टा व चक्रीवादळाचा प्रभाव (Heavy Rainfall)

ओडिसा आणि बंगालच्या उपसागर क्षेत्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेशकडे सरकला आहे. आता हा कमी दाबाचा पट्टा सेंट्रल मध्यप्रदेशकडून दक्षिण पुर्व मध्यप्रदेश तसेच उत्तर महाराष्ट्राकडे सरकत आहे. याशिवाय वायव्य बंगालच्या उपसागरत तसेच ओडिसाच्या किनारी प्रदेशालगत आणखी एक चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. ही चक्रीवादळाची स्थिती पूर्ण होत हे वादळ छत्तीसगड, पूर्व मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सिमाभागाकडे सरकरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्हीच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्या उत्तर भागात पावसाची सक्रीयता पाहायला मिळणार आहे. तसेच पश्चिम घाटातील मान्सून गुजरात किनारपट्टी व मध्यमहाराष्ट्राकडे आगेकुच करत आहे यामुळे मुसळधार पावसाचा जोर राहणार आहे. याचा प्रभाव आपल्याला उत्तर महाराष्ट्रात पहायला मिळणार आहे.

या दोन वातावरणाच्या प्रभावामुळे संपूर्ण आठडाभर अगदी शनिवार आणि रविवार पर्यंत महाराष्ट्रात मान्सून सक्रीय राहणार आहे. या दरम्यानच्या काळात धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा, बुलढाणा आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील विभाग आपले सरासरी पर्जन्यमान पूर्ण करण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या आठवड्यानंतर पाऊस पुढील ४८ तासांची विश्रांती घेऊन पुन्हा १२ जुलैनंतर सक्रीय होण्याची शक्यता आहे.

Back to top button