मुंबई : पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.५) भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेतला व संबंधितांना सूचना केल्या. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या ५ हजार सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते, याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली.
- अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लक्ष; सुरक्षा यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश
यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, पी. वेलारासू, आपत्कालीन संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे, उपायुक्त यासह आदी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?
- ENG vs IND : इंग्लंडचा विजय! भारतावर ७ गडी राखून मात
- Indian Navy : नौदलाच्या अग्नीपथ योजनेत महिलांना 20 टक्के प्रतिनिधत्व दिले जाणार
- New Delhi: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय पाण्डेंनी नोंदवला ईडीसमोर जबाब