एकनाथ शिंदे बंड करतील असं कधीही वाटलं नाही : जितेंद्र आव्हाड | पुढारी

एकनाथ शिंदे बंड करतील असं कधीही वाटलं नाही : जितेंद्र आव्हाड

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : आज विधिमंडळात शिंदे सरकारने बहुमत चाचणी पास केल्यानंतर अनेक आमदारांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही विधानसभेत आपले मत मांडले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोतुक केले. एकनाथ शिंदेंनी मनाचा कोतेपणा दाखवला नाही. शिंदेंचा संपूर्ण प्रवास मी पाहिलाय. एकनाथ शिंदेकडून शिकण्यासारखं आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेविषयी गौरवोद्गार काढले. एकनाथ शिंदे बंड करतील असं कधीही वाटलं नाही, असेही ते म्हणाले.

संघटना आणि सरकार वेगळं ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

Back to top button