मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जाणार; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल | पुढारी

मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जाणार; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

पुढारी ऑनलाईन: आज मी विधानभवनात येत होतो तेव्हा एकाही बंडखोर आमदाराने माझ्या आणि इतर शिवसैनिकांच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकले नाहीत. आता हे आमदार आपल्‍या मतदारसंघातील  मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जाणार, असा सवाल शिवसेनेचे युवानेते आमदार आदित्य ठोकरे यांनी केला.

विधिमंडळाच्‍या दाेन दिवसीय विशेष अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. विधानसभा अध्‍यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. यानंतर माध्‍यमांशी बाोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आता शिवसेनेच्‍या बंडखोर आमदारांना त्याच्या मतदारसंघात जावेच लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकालाच त्यांना उत्तर द्‍यावे लागणार आहे.

एकनाथ शिंदेंसोबत बंडखोर आमदार आणि भाजपने राज्यातील जनतेला आणि शिवसेनेला फसविले आहे. आरे कॉलनीत मेट्रो शेड बनविण्याचा नव्या सरकारचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे हे पाप करून सध्याच्या सत्ताधारी पक्षाने मुंबईकरांना फसवू नका, असेही आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

पाहा व्हिडिओ :

शिंदेंच्या बंडामागे ‘ठाकरे’ मुक्त शिवसेना हाच भाजपचा उद्देश : हेमंत देसाई

Back to top button