'व्हीप'विरोधात मतदान करून लोकशाहीची पायमल्ली केली : सुनील प्रभू | पुढारी

'व्हीप'विरोधात मतदान करून लोकशाहीची पायमल्ली केली : सुनील प्रभू

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये पक्षाचा ‘व्हीप’ जुगारून ३९ सदस्यांनी व्हीपविरोधात मतदान करून लोकशाहीची पायमल्ली केली. हे इतिहास कधी विसरणार नाही. याची खंत महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या मनात असेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केले. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ते बोलत होते.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावर बोलताना सुनील प्रभू म्‍हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री म्हणून ज्यांना बघत होतो त्यांना उपमुख्यमंत्री व्हाव लागलं. आमचं दु:ख विसरून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दु:ख वाटत आहे; पण दुर्दैव असे आहे की, नशीबाचे फेरे कधीही फिरू शकतात, या राज्यात असंही होऊ शकत, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

३९ सदस्यांनी व्हीप मोडून मतदान केले आहे. त्यामुळे या विधीमंडळाचा कार्यकाळ किती असेल याची मला शंका वाटते. सभागृहात पक्षाच्या व्हीपविरोधात मतदान करून लोकशाहीची पायमल्ली केली आहे. याची खंत विधीमंडळाच्या आणि महारष्ट्रातील जनतेच्या मनात कायम असेल, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचलंत का ?

Back to top button