मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शक्तीप्रदर्शन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शक्तीप्रदर्शन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासह इतर आमदारांनी
शक्तीप्रदर्शन करत विधानभवन प्रांगणात आगमन केले. विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारी, मान्यवरांसह अभिवादन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रविवारी (दि.३) रोजी सकाळी आपल्या गटाच्या आमदारांसह विधानभवन प्रांगणात येताना शक्ती प्रदर्शन केले. यावेळी एकनाथ शिंदे विजयाचे चिन्ह दाखवत आपल्याच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या आमदारांसह बसमधून विधानभवनात आले. त्यांनी विधानभवनात येताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर या आमदारांनी सभागृहात प्रवेश केला. शिंदे यांच्या आमदारांसह भाजपच्या आमदारांनी यावेळी भगवे फेटे घातले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button