विधानभवनातील शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयास टाळे! | पुढारी

विधानभवनातील शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयास टाळे!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंडखोर आमदारांचा गट आणि गटनेते अजय चौधरी यांचा शिवसेना गट यांच्यात अधिकृत शिवसेना विधिमंडळ पक्ष कोणता, यावरून घनघोर लढाई सुरू असताना, विधानभवनातील शिवसेना विधिमंडळ पक्षाचे कार्यालयाला टाळे ठोकले आहे. परंतु हे टाळे कोणी लावले, याबाबात आम्हाला काही माहीत नाही, असे विधिमंडळ सचिवयालाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विधानभवनातील शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयावर ताबा मिळविण्यासाठी हे टाळे ठोकले गेले आहे. तसेच या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष दररोज नवनवी वळणे घेताना दिसत आहे. शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांचे सरकार आज विधासभेत पहिल्या अग्निपरीक्षेला सामोरे गेले. आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या वतीने ॲड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत नार्वेकर बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांना १६४ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. बविआ आणि मनसेने राहुल नार्वेकरांच्या बाजूने मतदान केले.

हेही वाचा  

Back to top button