वडगाव मावळ : अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न | पुढारी

वडगाव मावळ : अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न

वडगाव मावळ : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचे अपहरण करून तलवार, दगड व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राजू सोपान आंद्रे (रा. नाणे, ता. मावळ, जि.पुणे) तसेच अनोळखी चौघांवर (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत शांताराम भेगडे (वय 29, रा. कामशेत) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या महितीनुसार फिर्यादी प्रशांत भेगडे यांचे आरोपी राजू आंद्रे यांच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. आरोपी राजू आंद्रे व त्याचे 4 साथीदारांनी संगनमताने फिर्यादी भेगडे यांना जेजुरीचे भाडे आहे, ते ठरवायचे आहे. असे खोटे सांगून कान्हे ते टाकवे बुद्रुक रोडवरील जांभुळ फाटा येथे बोलावून एका कारमध्ये नेऊन अपहरण केले.

किल्ले रायगडाच्या पायथ्याला एक किलोमीटर लांब पडल्या भेगा, भूगर्भीय शास्त्रज्ञांकडून आज पाहणी (व्हिडिओ)

त्यानंतर फिर्यादी भेगडे यांना कुसुगाव प. मा. येथील एका डोंगरावर नेऊन फिर्यादी त्यांच्या पायावर, पाठीवर, छातीवर दगडाने मारहाण केली. पोटामध्ये लाथा मारून आरोपी राजू आंद्रे याने तलवारीने डोक्यात डावे बाजूस वार करून गंभीर दुखापत केली व त्यांच्या मृत्यू झाला असल्याचे समजून मृतदेह कारमधून घेऊन जाऊन पिंपरी (ता. मुळशी) येथील एका खोल दरीत टाकून देण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी भेगडे यांच्यावर सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Back to top button