मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथबद्ध | पुढारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथबद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या राजकारणात मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज (दि.३०) पूर्णविराम मिळाला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्‍यमंत्रीपदी शपथबद्‍ध झाले. माझा मंत्रीमंडळात सहभाग असणार नाही, अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्‍यांना फोन करुन उपमुख्‍यमंत्रीपदाची जबाबदारी स्‍वीकारावी, असा आदेश दिला. त्‍यानुसार त्‍यांनी उपमुख्‍यमंत्रीपदाची जबाबदारी स्‍वीकारली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्‍त पत्रकार परिषद घेतली हाेती. यावेळी त्‍यांनी एकनाथ शिंदे महाराष्‍ट्राचे नवे मुख्‍यमंत्री असतील, अशी घोषणा केली होती. याचवेळी त्‍यांना आपण मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी प्रतिक्रिया  भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केली होती.

फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जात होते. परंतु, फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी फडणवीस यांना दोन वेळा फोन करून त्यांना राजी केल्याचे सांगितले जाते आहे.

Back to top button