देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे : जे. पी. नड्डा | पुढारी

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे : जे. पी. नड्डा

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी प्रतिक्रिया  भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे फडणवीस आता कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली. परंतु आपण मंत्रिमंडळात नसेल, असे सांगत फडणवीस यांनी धक्का दिला होता. त्यानंतर आता नड्डा यांनी त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्‍यमंत्री होतील, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली.  आज रात्री साडेसात वाजता केवळ एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल. लवकरच मंत्रिमंडळ विस्‍तार करु. या विस्‍तारामध्‍ये एकनाथ शिंदे यांच्‍यासोबत असलेले आमदार, अपक्ष आणि भाजपचे लोक या मंत्रीमंडळात असतील. माझा मंत्रीमंडळात सहभाग असणार नाही. मी स्‍वत: बाहेर असेन; पण सरकार व्‍यवस्‍थित चालविण्‍याची जबाबदारी माझ्‍यावरही असेल, माझे पूर्ण पाठबळ या सरकारला असेल,  असेही फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले हाेते.

भाजप शिवसेना युतीचे सरकार बनेल, अशी घोषणा २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी केली होती. मात्र, हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस राष्ट्रवादीशी शिवसेनेच्‍या नेतृत्त्‍वाने युती केली आणि भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवले. त्यावेळी जनमताचा अवमान केला. आम्‍ही मुख्‍यमंत्रीपदासाठी लढत नाही. ही तत्त्‍वाची लढाई आहे, असेही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट केले हाेते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button