Gajanan Kirtikar
Gajanan Kirtikar

…तर मला कधीही अटक करू शकता : संजय राऊत

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) माहिती देण्यास विलंब लागेल. उद्या चौकशीसाठी जाऊ शकत नाही, तरीही दिल्लीतून भारतीय जनता पार्टीचा व महाराष्ट्रातील नेत्यांचा  अटक करण्याचा आदेश असेल तर कधीही अटक करू शकता, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. उद्या सकाळी ११ वाजता राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही ईडीकडून देण्यात आले आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी शिवसेनेचा वाघ आहे. कोणत्याही बनावट कारवाईने माझं मनोधैर्य खच्चीकरण करू शकणार नाहीत. जिथे असेल तिथं शिवसेनेसाठी लढत राहीन. माझी मान कापली तरी मी गुवाहटीला जाणार नाही. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे ईडीला माहिती देण्यासाठी विलंब लागेल. उद्या अलिबागला शिवसेनेची सभा आहे. त्या सभेला उपस्थित राहवं लागणार आहे.  त्यामुळे ईडी कार्यालयात जाऊ शकत नाही. दिल्लीतून भारतीय जनता पार्टीचा आदेश असेल तर मला कधीही अटक करू शकता असे राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news