आता कसं वाटतंय ? मनसेच्या बॅनरबाजीने शिवसेनेला डिवचले  | पुढारी

आता कसं वाटतंय ? मनसेच्या बॅनरबाजीने शिवसेनेला डिवचले 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा एकनाथ शिंदे यांच्या बंडातून सुरू झालेल्या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. ‘त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय,’ अशी बॅनरबाजी करून मनसैनिकांनी शिवसेनेला डिवचले आहे. साकीनाका, चांदिवली येथे शिवसेनेचे आमदार असलेल्या दिलीप (मामा) लांडे यांच्या मतदारसंघात महेंद्र भानुशाली या मनसैनिकाने हे बॅनर लावले आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्यांनी अपक्षांसह मनसेचे नगरसेवक फोडण्याची रणनीती आखली. यात शिवसेना नेते अनिल परब व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आघाडीवर होते. मनसेचे दिलीप (मामा) लांडे यांच्यासह अश्‍विनी माटेकर, दत्ता नरवणकर, परमेश्‍वर कदम, अर्चना भालेराव, हर्षदा मोरे हे पाच नगरसेवक फोडले होते. त्यामुळे पालिकेतील शिवसेनेचे बहुमत वाढले होते. याची आठवण या बॅनरबाजीतून मनसेने शिवसेनेला करून दिली आहे.

हेही वाचा

Back to top button