Shiv Sena : आणखी ‘या’ पाच आमदारांना अपात्र ठरवण्याची शिवसेनेची मागणी | पुढारी

Shiv Sena : आणखी 'या' पाच आमदारांना अपात्र ठरवण्याची शिवसेनेची मागणी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आधी बारा आमदारांना निलंबित करण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) आणखी पाच बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी दुसरा अर्ज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिला आहे. त्यावर झिरवाळ कोणता निर्णय घेतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

(Shiv Sena)  मुंबईतील दादर येथील आमदार सदा सरवणकर, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकाश आबिटकर, मेहकर विधानसभा मतदासंघाचे आमदार संजय रायमुलकर, नांदेडचे बालाजी कल्याणकर आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना अपात्र ठरविण्यात यावे, असे पत्र शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी यांनी दिले आहे.

शिवसेनेने आपल्या आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलवली होती. जे आमदार या बैठकीला येणार नाहीत, त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणास्तव कारवाई केली जाईल, असा इशारा शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे दिला होता. या बैठकीला १७ आमदारच उपस्थित होते. त्यामुळे पहिल्यांदा १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेने केली. त्यानंतर शुक्रवारी आणखी पाच आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. जर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या १७ आमदारांना अपात्र ठरविले, तर सभागृहात बहुमत चाचणीवेळी त्यांना मतदान करता येणार नाही.

हेही वाचलंत का ? 

Back to top button