Draupadi Murmu : संघर्ष हेच जीवन… क्लार्क ते राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांचा थक्क करणारा प्रवास…   | पुढारी

Draupadi Murmu : संघर्ष हेच जीवन... क्लार्क ते राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांचा थक्क करणारा प्रवास...  

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

भाजप पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) वतीने राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्‍हणून द्रौपदी मूर्मू (Draupadi Murmu) यांच्‍या नावाची घाेषणा करण्‍यात आली आहे. या पूर्वीही २०१७ मध्‍ये त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या त्‍याचवेळी राष्‍ट्रपतीपदासाठी त्‍याच्‍या नावाची चर्चा झाली हाेती. मात्र त्‍यावेळी  रामनाथ कोविंद यांच्‍या नावावर शिक्‍कामाेर्तब झाले.आपला राजकीय प्रवास नगरसेविका पदापासून सुरु द्रौपदी मूर्मू यांचा जीवन प्रवास जाणून घेवूया.

Draupadi Murmu
Draupadi Murmu

Draupadi Murmu : तर पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या  बैठकीत राष्‍ट्रपतीपदासाठी २० नावांची चर्चा सुरु होती. अखेर ओडीसाच्या द्रौपदी मूर्मू (Draupadi Murmu) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

Presidential Election : द्रौपदी मुर्मू भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार

 पती व दोन्ही मुलांचा मृत्‍यू

 द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडीसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. वडील बिरंची नारायण टुडू हे संथाल आदीवासी जमातीचे तालुका प्रमुख होते. त्यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्‍य हाेती.  पण लग्नानंतर काही वर्षांनी दोन्ही  मुले व पती यांचा मृत्‍यू झाला.

Draupadi Murmu
Draupadi Murmu

घर आणि मुलीच्या शिक्षणासाठी शिक्षकेची नोकरी

(Draupadi Murmu) पतीच्या व मुलांच्या निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी  द्रौपदी मुर्मू  यांच्यावर पडली. त्यांनी घर सांभाळण्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी शिक्षकेची नोकरी पत्करली. त्यानंतर त्यांनी ओडीसा पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक(लिपीक) पदाची नोकरी केली. नोकरीच्या पैशातून घरखर्च आणि मुलीचे शिक्षण पूर्ण झाले. मुलीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॅकेत नोकरी सुरु केली. नंतर तिचा विवाह झारखंड येथील गणेश यांच्याशी झाला.

द्रौपदी यांनी आपला राजकीय प्रवास हा नगरसेविका पदापासून सुरु केला. १९९७ साली त्यांनी रायरंगपूरच्या नगर पंचायतच्या नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. यानंतर त्या भाजपच्‍या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा बनल्या.

द्रौपदी मुर्मू यांनी २००० आणि २००९ मध्ये ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. २००० ते २००४ या दरम्यान वाणिज्य, वाहतूक मंत्री झाल्या. नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल आणि ओ.बी.पी. युती सरकारच्या काळात मत्स्य आणि प्राणी संसाधन खात्यात मंत्री. मे २०१५ मध्ये द्रौपदी मुर्मू या  झारखंडच्या राज्यपाल झाल्या.

झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही द्रौपदी मुर्मू यांनामिळाला. गेला. राज्यपाल झालेल्या त्या पहिल्या आदिवासी म.िहिला आहेत.

Draupadi Murmu
Draupadi Murmu

आता  राष्ट्रपती पदाच्‍या निवडणुकीत त्‍या यशस्‍वी झाल्‍या तर त्या देशाच्‍या पहिल्‍या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरतील. देशाच्या राष्ट्रपती बनणाऱ्या ओडिशातील दुसऱ्या व्यक्ती असतील. द्रौपदी मुर्मू यांच्‍या आधी ओडिशाचे व्हीव्ही गिरी देशाचे राष्ट्रपती राहिले आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणूका १८ जूलैला होणार आहे. तर मतमोजणी २१ जूलैला होतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २४ जूलै संपणार आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button