शिवसेनेचे मंत्रीही एकनाथ शिंदेंसोबत! संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई बंडात सामील | पुढारी

शिवसेनेचे मंत्रीही एकनाथ शिंदेंसोबत! संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई बंडात सामील

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांबरोबरच रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे फोन बंद असल्याने ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्याचे शिलेदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील आमदारांसह शिवसेनेचे तीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोर्‍हाळ्यातील सिद्धेश्वर दिंडीचे प्रस्थान

संदिपान भुमरे, शंभूराज देसाई आणि अब्दुल सत्तार यांचे फोन लागत नाहीत. कृषी मंत्री दादा भुसे हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याची चर्चा होती. मात्र, भुसे यांनी अपूर्व वर्षावरील होणाऱ्या आमदारांच्या बैठकीला हजर राहणार असल्याचे सांगितले आहे. आता वर्षा बंगल्यावरील बैठकीला शिवसेनेचे किती मंत्री आणि आमदार पोहोचतात, यावरून एकनाथ शिंदे यांच्या बंडाची व्याप्ती समोर येणार आहे.

Back to top button