मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी : संजय राऊत | पुढारी

मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय सैन्यामध्ये ठेकेदारीपद्धतीने भरती केली जात असेल तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर केली.

संरक्षण दलातील अग्निपथ भरती योजनेविरोधातील उद्रेकाचे लोण देशभर पसरले आहेत. या योजनेची औपचारिक भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने अनेक राज्यांत या योजनेविरोधात हिंसक निदर्शने केली जात आहेत. सरकारच्या या योजनेवर शिवसेनेचे नेते राऊत यांनी जोरदार टीका केली. मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

भारतीय सैन्याला एक शिस्त आहे. ठेकेदारीवर सैन्य भरती करण्याची सरकारची योजना हा सैन्याचा अपमान आहे. कंत्राटी पद्धतीमुळे भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. ठेकेदारीवर सैन्य चालू शकत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात अनेक पक्षांचे नेते असून दोन्ही बाजूंकडून सहमतीचा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ?

Back to top button